डॉ. अदिती पी. पाटील - Doctor
‘सावंत कोचिंग क्लासेस’ एक शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्ण क्लास. मी इयत्ता 8 वी ते 12 वी ही पाच महत्त्वाची शैक्षणिक वर्षे या क्लासच्या मार्गदर्शनाखाली होते. प्रत्येक रविवारी घेतल्या जाणार्या सराव परीक्षा, सर्व विषयांची वारंवार घेतली जाणारी उजळणी, विशेषतः दहावी, बारावी, CET च्या तयारी साठी घेतल्या जाणार्या सराव परीक्षा, क्लासमध्ये असणारे ग्रंथालय यामुळे परीक्षेची तयारी आपोआपच होऊन जाते. प्रत्येक विद्यार्थ्याकडे दिले जाणारे वैयक्तिक लक्ष आणि सर्व विषयांचे सखोल मार्गदर्शन त्यामुळे बेसिक चांगले होण्यास खूप मदत होते.
आदरणीय ‘सावंत सर’ या क्लासला लाभलेले एक अतिशय शिस्तप्रिय आणि प्रभावी, प्रेरणादायी नेतृत्व. अगदी सायकल पार्किंगपासून प्रत्येक बॅच, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षक यांच्याकडे वैयक्तिक लक्ष असणारे असे हे नेतृत्त्व या क्लासला लाभल्यामुळेच आज एवढ्या स्पर्धेमध्ये देखील हा क्लास स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करू शकला आहे.
या क्लासमधील शैक्षणिक यशामुळेच मी आज डॉक्टर आहे, यामध्ये आदरणीय सावंत सर आणि मला मार्गदर्शन केलेल्या या क्लासमधील सर्व शिक्षकांचा मोठा वाटा आहे.
धन्यवाद!